महाड प्रांत कार्यालयाजवळ वाढत्या उष्णतेमुळे विद्युत ट्रान्सफॉर्मर चा स्फोट सुदैवाने जीवित आणि टळली
महाड, दि ५
महाड उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांच्या कार्यालयात बाहेर असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा वाढत्या उष्णतेमुळे स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली मात्र महानगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या बंबाने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने जीवित वित्त हानी टळली
महाड उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर चा वाढत्या उष्णता मानामुळे स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना घडली मात्र महानगर परिषदेच्या अग्निशामक दलाने या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने या आगीमध्ये सुदैवाने जीवित टळली मात्र बाजूला असणाऱ्या फुल विक्रेता व एक दुकान व एका हॉटेलचे नुकसान झाले आहे
आग लागल्याची घटना घडतात बाजूला राज्य परिवहन महामंडळाचे एसटी आगार असल्याने व रस्त्यावरून जाणारी येणारी वाहतूक असल्याने काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. KK/ML/MS