पुराच्या पाण्यामुळे शहरात आली मगर….

महाड दि १९ — रायगड जिल्ह्यात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसात माणगाव मध्ये पुराच्या पाण्यामुळे एक मगर शहरी भागात आढळून आली आहे. नागरिकांना मुंबई गोवा महामार्गालगत एक मगर जखमी अवस्थेत असल्याचे आढळले, पुराच्या पाण्यासोबत ही मगर आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधी देखील मागणाव मध्ये नागरी भागात मगर आढळून आल्याची घटना घडली होती.
प्राणी मित्रांना या मगरीची माहिती देताच वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिला पकडून वनविभागाच्या हवाली केले. या मगरीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. लवकरच या मगरीवर योग्य तो उपचार करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वन विभाग कडून सांगण्यात आले आहे. ML/ML/MS