आजपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीही ‘या’ नावाने होणार सहभागी
आजपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. या कुंभमेळ्यात ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल सहभागी झाल्या आहेत. या कुंभमेळ्यासाठी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी त्यांना आपलं गोत्र प्रदान केलं आहे. लॉरेन पॉवेल यांना त्यांच्या गुरूचं गोत्र मिळाल्यानंतर त्यांना कमला हे नवं नाव देण्यात आलं आहे. लॉरेन पॉवेल यांना सनातन धर्मामध्ये रुची आहे. तसेच त्यांना अच्युत हे गोत्र देण्यात आलं आहे. त्या काही दिवस आखाड्यात राहणार आहेत. त्यानंतर त्या भारतातील इतर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.