महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक
मुंबई, दि २८
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये शिक्षण प्रसारकाच काम केलं असून त्यांच्यामुळेच अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या असे जाहीर प्रतिपादन काँग्रेसचे माजी आमदार मधू अण्णा चव्हाण यांनी त्यांच्या भायखळा येथील जनसंपर्क कार्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना केले.
ते पुढे म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या. सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन विविध प्रकारचे समाजकार्य सुरुच ठेवले. त्यांनी प्रथम मुलींची शाळा काढून मुलींना शाळेत प्रवेश दिला. त्यांचे कार्याची या तरुण पिढीने प्रेरणा घेऊन समाजाचे अशाच पद्धतीने काम केले पाहिजे अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते समीर चव्हाण, उमेश साळवी आणि विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS