दिव्यांग बांधवांना मदत करणे हे माझे परम कर्तव्य
मुंबई, दि १५
दिव्यांग बांधवांना त्यांच्या आधाराची साधने देणे आणि त्यांना प्रत्येक कामात मदत करणे हे माझे परम कर्तव्य असल्याची माहिती शिवसेनेचे मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील यांनी मुंबादेवी येथे दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप कार्यक्रमात केली. ते पुढे म्हणाले आम्ही विभागात विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. दिव्यांग नागरिकांना देखील त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना हवे असणारी साधने उपलब्ध झाली पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी मोफत विल चेअर, वॉकर आणि ज्येष्ठ आधार काठीचे वाटप केले असून यापुढे देखील दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
रुपेश पाटील यांचे काम मी पाहत आले असून त्यांनी समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी काही ना काही समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण त्यांनी हा घेतलेला ज्येष्ठ नागरिकांचा आधार कार्यक्रम फार मनाला आनंद देऊन गेला. त्यांनी अशाच प्रकारे लोकोपयोगी कार्यक्रम विभागात सुरू ठेवावे अशी अपेक्षा सुशीबेन शाह यांनी यावेळी व्यक्त केली.
याचवेळी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष मार्फत लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ सुपूर्द करण्यात आले.तसेच २०२६ दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमात
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, महिला विभागप्रमुख रेखा सुरणकर, माजी विभागप्रमुख दिलीप नाईक, महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील, रेखा मोरे, रुची वाडकर, तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS