एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

 एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

एमपीएड आणि एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास ५ ते २० जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एमपीएड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १ हजार ३८ तर एमएड अभ्यासक्रमास १ हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमपीएड अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २४ मार्च रोजी होणार असून फिल्ड परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे.तसेच एमएड अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *