LPG सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, भोपाळमध्ये 808.50 रुपये, जयपूरमध्ये 806.50 रुपये, पटनामध्ये 901 रुपये तर मुंबई मध्ये ८०३ रुपये अशा किमती कमी झाल्या आहेत. यापूर्वी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात २०० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर, दिल्लीत किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये, जयपूरमध्ये 906 रुपये झाली होती.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील 33 कोटी ग्राहकांना होणार आहे.केंद्र सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत LPG सिलिंडरवर दिले जाणारे 300 रुपयांचे अनुदान 31 मार्च 2025 पर्यंत वाढवले आहे. 7 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या योजनेचा फायदा 10 कोटींहून अधिक महिलांना होणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले होते. अनुदानित सिलिंडरच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 10 सिलिंडरवर अनुदान मिळत होते, आता ते 12 करण्यात आले आहे.
SL/KA/SL
8 March 2024