खराब ध्वनिक्षेपक यंत्रणेने पाडले विधानसभेचे कामकाज बंद

 खराब ध्वनिक्षेपक यंत्रणेने पाडले विधानसभेचे कामकाज बंद

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात प्रामुख्याने विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळाने तर आजकाल सत्तारूढ पक्षाच्या वतीनेही गदारोळ झाल्याने सभागृह बंद करण्याची परंपरा आहे मात्र आज विधानसभेतील अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणाच खराब झाल्याने अर्धा तास कामकाज बंद करावे लागण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली.

गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या मुंबईतील विधानमंडळात दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरूच आहे, अध्यक्ष बदलले तरी ते वेगवेगळ्या मार्गातून सुरूच राहिले आहे. नवीन अध्यक्षांच्या काळात विधानसभा सभागृहाची ध्वनी यंत्रणा बदलून टाकण्यात आली आहे. आधीची उत्तम दर्जाची बॉश कंपनीची यंत्रणा बदलून त्या जागी ब्राहलर या अन्य चांगल्या कंपनीची यंत्रणा लावण्यात आली आहे.

ही यंत्रणा बदलून टाकण्यात आल्यानंतर ती कायमच गाजत राहिली आहे, अनेक वेळा त्यात दोष आढळले आहेत, अनेक वेळा त्यातून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात , बऱ्याच वेळा माईक सुरूच होत नाही. अनेकवेळा खरखर येते . वीस तारखेला झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री बोलायला उभे राहिल्यावर आवाजच येत नव्हता , त्यामुळे सभागृहात सदस्यांनी आरडाओरड केली होती. काल अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माईकच बंद पडल्याने पुन्हा गोंधळ झाला होता, आज काँग्रेसचे नाना पटोले बोलायला उभे राहिल्यावर माईक मधून फटाके वाजायला लागले.

या पार्श्वभूमीवर पटोले यांनी याची एस आय टी नेमून चौकशी करण्याची मागणी केली, त्यावर समोर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसल्याने असे झाल्याचा टोला लगावला. तो तुम्हीच घुसवला आहे तो म्हणूनच sit चौकशी करा अशी मागणी केल्याचे ते म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील या विनोदात सहभागी झाले, मात्र ध्वनी यंत्रणा सतत त्रास देतच राहिल्याने अखेर त्यांनी अर्ध्या तासासाठी कामकाज बंद केले , त्यानंतर पुन्हा यंत्रणा तपासून काम सुरू करण्यात आले. Loudspeaker down due to faulty system, assembly shut down

ML/KA/PGB
28 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *