लोटे MIDC तील कंपनीत भीषण स्फोट; ९ कामगार होरपळले…0PP
रत्नागिरी दि ६ : खेड लोटे MIDC मधील डॉक्टर खान कंपनीत दोन मोठे स्फोट झाले. दुपारी २.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. स्फोटा नंतर परिसरात मोठा आवाज होऊन हादरे बसले. या अपघातात कंपनीतील ९ कामगार जखमी झाले आहेत. यातील ४ कामगार गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर इतर ५ जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींना उपचारासाठी लोटे, चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेनंतर MIDC अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.ML/ML/MS