कस्टम अधिकाऱ्यास
मारहाण करून लुटले

 कस्टम अधिकाऱ्यासमारहाण करून लुटले

उलवे नोड : उलव्यात भररस्त्यात गाडी अडवून कस्टम अधिकाऱ्यास लोखंडीरॉड, बॅट ब लाकडी स्टम्पच्या सहाय्याने बेदममारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीसहपर्समधील इतर ऐवज असा एकूण सव्वा लाखरूपयांचा ऐवज लुटून नेल्याची गंभीर घटना ३१ मे रोजी घडली होती.

या प्रकरणी कस्टम अधिकारी विनय जितेंद्र कुमार
यांनी दिलेल्या माहिती नुसारबारमालका सह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. कस्टमचे अधिकारी
असलेले विनय कुमार हे उलवे येथे घरी जात असताना त्यांना वाशी येथील एसबी बारचे मॅनेजर
सुधीर शेट्टी, करीम मुल्ला आणि ऑटो चालक रणजित सिंग यांनी संगनमत करून शेट्टी यांच्या बारमधील दोन मुली (सुधीर शेट्टी ची गर्लफ्रेंड पायल सोम हिचा सांगण्यावरून भर रस्त्यात विनयकुमार यांची गाडी अडविली व त्यांना लोखंडी रॉड, बॅट, स्टम्प आणि लाकडाने जबरी मारहाण करण्यासह त्यांच्या गळ्यातील
७६ हजार रूपयांची २२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी २५
हजार रूपयांचा आयफोन व आधारकार्ड, पॅनकार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे डेबीट कार्ड असे साहित्य
असलेले महागडे लेदरचे पॉकेट असा एकूण १ लाख १५
हजार रूपयांचा ऐवज घेवून घटनास्थळाहून पलायन
केले. या मारहाणीत जखमी झालेले कस्टम अधिकारी विनय कुमार अपोलो इस्पितळामध्ये उपचार घेत असून त्यांच्या
तक्रारीवरून उपरोक्त पाच ते सहा जणांविरोधात
उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून उलवे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम ३२४(१), १२६(२), ३२४(६) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यात आरोपी १) सुधीर शेट्टी, ३६ वर्षे २) करिमुल्ला मालीवाले ,३६ वर्षे दोन्ही उलवे यांचे निवासस्थान ३.) रणजित वीरेंद्र सिंग २६ कोपरी, वाशी यांचे निवासस्थान येथील असून सदर प्रकरणी गुन्ह्यातील तिन्ही आरोपी जेरबंद असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *