IMD कडून मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर

 IMD कडून मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याने नुकताच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहणार असून ९४ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तो उशिराने दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर मे महिन्यात दुसरा दीर्घकालीन अंदाज येतो.

हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी मोसमी पाऊस हा देशात सामान्य राहणार आहे. आपल्याकडील शेती पावसावर आधारित आहे. यामुळे यंदा 94-106%) असण्याची शक्यता आहे. सध्या मान्सून अंदमानच्या सागरात आहे. बंगालच्या उपसागराकडे त्याची प्रगती होत आहे. केरळमध्ये १ ऐवजी ४ जून रोजी मान्सून दाखल होणार आहे.

भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचादेखील प्रभाव राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली होती. एल निनो म्हणजे कमी पाऊस असे असले तरीही एल निनो असताना अनेकदा चांगला पाऊसही झाला आहे.

मान्सून सध्या बंगालच्या उपसागराकडे सरकत असून केरळमध्ये तो चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील काही भागांत सामान्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *