मंत्री लोढा यांच्यावर विधान परिषदेत झाले आरोप , राजीनाम्याची तयारी

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझ्या विरोधात पुरावे दया मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो असे आव्हान आज कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले.
आपण राजीनामा ही सोबत आणला आहे असे ते म्हणाले.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली मात्र उपसभापती यांनी राजीनामा देऊ नका असे त्यांना सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आपले मत मांडत असतांना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचावर थेट आरोप करीत लोढा यांचे नाव घेत ते अवैध बांधकाम उघड्या डोळ्याने बघत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्या कामकाजावर सडकून टीका केली.
यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की अंबादास दानवेंनी माझे नाव घेतले. 10 वर्षांपासून माझे कुटुंब विविध व्यवसायात आहेत. कुटुंबाचा व्यवसाय जगभरात सुरू आहे. वैध काम करून पैसा कमावित आहे, एकही अवैध काम माझ्याकडून होत नाही. 30 वर्षापासून विधानसभेचा मी सदस्य आहे. एकही अवैध काम केले नाही,सार्वजनिक जीवनात आहे, कुटुंब व्यवसायात असणे हा काही गुन्हा आहे का ? असा प्रश्न करीत विरोधी पक्षनेते यांनी माझ्या विरोधात पुरावे दया मी लगेच माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो असे म्हणून उपसभापति नीलम गोऱ्हे यांचा कडे राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.
मंगल प्रसाद लोढा यांनी आपला राजीनामा सोबत आणला होता आणि उपसभापतींकडे देत होते मात्र गोऱ्हे यांनी राजीनामा देऊ नका अशी विनंती केली… माझ्याकडून एक इंचही अवैध काम केल्या जात नसून आपण अत्यंत पारदर्शकतेने काम करतो. असेही लोढा यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर म्हटले की, मी पुरावे द्यायची माझी तयारी आहे. मंत्री महोदयांचा अनादर करायचा नाही पण तक्रारी येतात, त्या मांडणे पाप आहे का, ज्या तक्रारी माझ्याकडे आल्या त्या तुमच्याकडे पाठवितो. असे म्हटले. यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले की, सभागृहात नाव घ्याचा असेल तर नोटीस देण्याचा नियम आहे. नियमाची स्पष्टता असतानाही वारंवार अस का घडतंय. असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करीत हा विषय थांबविण्याचे निर्देश दिले.
ML/KA/PGB 20 Dec 2023