पेपरफुटी आणि ‘चीटिंग विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकसभेत सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि चीटिंग रोखण्यासाठी ‘चीटिंग विरोधी’ विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार, परीक्षेचे पेपर लीक करण्यासाठी किंवा उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संगनमत करणाऱ्यांना मोठी शिक्षा होऊ शकते. या विधेयकानुसार, परीक्षेचे पेपर लीक करताना किंवा उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोषी आढळल्यास 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे या विधेयकानुसार सर्व गुन्हे अजामीनपात्र असतील. तसेच पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचा आणि वॉरंटशिवाय संशयितांना अटक करण्याचे अधिकार असतील.

आता विधेयक राज्यसभेत म्हणजे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या औपचारिक मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.पेपरफुटीविरोधातील हे विधेयक त्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारे आहे.यामुळे वर्षभर मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पायावर उभे राहण्याचं स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांच्या कष्टांना योग्य न्याय मिळणार आहे.

याआधी, मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये (महानगरपालिका आणि पंचायत) आरक्षणावरील चर्चेने सभागृहाचे कामकाज सुरू झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर स्थानिक संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक 2024 सादर केले होते.

येथे, राज्यसभेत संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक 2024 आणि संविधान (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आदेश (सुधारणा) विधेयक 2024 वर चर्चा सुरू झाली. त्याचवेळी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात नित्यानंद राय म्हणाले की, आमचे सरकार महिलांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये 41 हजार 606 महिला सैनिक तैनात आहेत.

SL/KA/SL

6 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *