२१ साखर कारखान्यांना सरकारकडून कर्जाची हमी

 २१ साखर कारखान्यांना सरकारकडून कर्जाची हमी

मुंबई, दि. २५ (एमएसी न्यूज नेटवर्क) : राज्यात लोकसभा निवडणूकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच राज्य सरकारने आजारी साखर कारखान्यांना कर्ज देण्याची हमी दिल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने २१ साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी घेतल्याने या कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. या २१ पैकी १५ कारखाने सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गटातील नेत्यांचे आहेत. तर सहा कारखान्यांमध्ये दोन शरद पवार गट, एक काँग्रेस, दोन अपक्ष आणि एक तटस्थ असणाऱ्या नेत्याचे आहेत.

राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असल्याने बहुतांश सहकारी कारखाने हे आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून चालवले जातात. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची हमी मिळालेली नाही. गेल्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून पाच कारखान्यांना कर्जाची हमी देण्यात आली होती. यावेळी राज्य सरकारने १७८.२८ रुपये कर्जाची हमी दिली होती. तर २०२२-२३ या वर्षात ३४ कारखान्यांना ८९७.६५ कोटींचा कर्ज पुरवठा राज्य सहकारी बँकेकडून केला गेला होता. त्यापैकी १७८.२८ कोटी रुपयांची कर्ज हमी ही सहा कारखान्यांना दिली होती.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) च्या माध्यमातून सहकारी कारखान्यांना कर्ज दिले जाते. मात्र हे कर्ज राज्य सरकारने हमी दिल्यानंतरच देण्यात येते. यामुळे अनेक साखर कारखाने हे सद्या आजारी आहेत. यांच्याकडे पुरेसे भांडवल नसल्याने कर्जासाठी राज्य सरकारकडे अनेक प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र यातील जे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्या प्रस्तावांवर राज्य सरकारने हमी दिली आहे. अशा २१ साखर कारखान्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हमी दिली आहे.

SL/ML/SL

25 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *