छोट्याश्या मुंग्या जेव्हा सिंहांना त्यांची शिकारीची पद्धत बदलायला भाग पडतात..

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जगात वारंवार होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांसाठी लहान जीव किंवा प्राणी जबाबदार असतात. याचे सर्वात ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. कोरोना नावाच्या छोट्या विषाणूने संपूर्ण जग हादरले होते. असाच प्रकार आता आफ्रिकन जंगलात दिसून आला आहे, ज्यामुळे जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलाढ्य सिंहाने आपल्या शिकारीच्या वर्तनात बदल केला आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात हा किरकोळ बदल दिसत असला तरी त्याचा जंगलातील नैसर्गिक अधिवासावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो असा अंदाज पर्यावरणवादी वर्तवत आहेत.
या संदर्भातील अभ्यास सायन्स जर्नलमध्ये (Science journal) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आफ्रिका खंडातील केनिया देशातील फ्लोरिडा या विद्यापीठातील प्राध्यापक टॉड पाल्मर हे या संशोधन अभ्यासातील प्रमुख सहअभ्यासक आहेत.
‘द गार्डियन’ ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “या संशोधनातून समोर आलेल्या माहितीने आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत.
स्थानिक मुंग्याच्या अधिवासात नव्याने आलेल्या मुंग्यांनी केलेले परिणाम, त्यातून त्यांचं झाडांशी असणारं नातं आणि त्यातून प्राण्यांच्या शिकारीवर होणारा परिणाम इथपर्यंत पोहोचले आहे.”
या अभ्यासात संशोधकांनी सुरुवातीला आफ्रिकेतील जंगलांचे काही भाग पाडत त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.
मागील तीन वर्षांपासून ते याबाबतचा अभ्यास करत आहेत. यात त्यांना असे दिसून आले की झेब्रांची शिकार करण्याचे प्रमाण कमी केले आहे आणि म्हशींची शिकार ते जास्त प्रमाणात करत आहेत.
मात्र यामुळे म्हशींची संख्या कमी झालेली नाही. हे शोधण्याचा त्यांचा प्रवास हा मुंग्यांपर्यंत जाऊन थांबला आहे.
आफ्रिकेतील काही काटेरी झाडांवर कायमच तेथील स्थानिक मुंग्या आढळून येत असे. या मुंग्या या काटेरी झाडांचे संरक्षण करत त्या बदल्यात या मुंग्यांची सुरक्षा ही झाडे करत. त्यांची अंडी या झाडांवर सुरक्षितपणे वाढविली जात.
काटेरी झाडे हे प्रामुख्याने हत्ती किंवा जिराफ यांचे अन्न आहे. हे प्राणी जेव्हा ही झाडे खाण्यासाठी येत त्यावेळी या स्थानिक मुंग्या त्यांचा चावा घेत असे. त्यामुळे ही झाडे टिकून राहण्याचे प्रमाण अधिक होते.
परंतु साधारण दोन दशकांपूर्वी एका बेटावर सापडलेल्या मोठ्या डोक्याच्या मुंग्यांनी मात्र ही पर्यावरणीय साखळी (Environmental cycle) हलवून ठेवली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. Little Ants When Lions Are Forced To Change Their Hunting Patterns..
ML/KA/PGB
29 Jan 2024