इफ्फीसाठी भारतीय चित्रपटांची यादी जाहीर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी सहा भाषांमधल्या वैविध्यपूर्ण विषय मांडणाऱ्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंड भाषा) भाषांमध्ये आहेत.
या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु माहितीपट, माहितीपट, भयपट आणि कथात्मक अॅनिमेशन पट असं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे. या सर्व कलाकृतींमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत. यात पितृसत्ता, शहरांमधला असंतोष, बिकट गरिबीची स्थिती, हवामानविषयक संकटे, राष्ट्रवाद तसेच खेळ / आरोग्यविषयक तंदुरुस्ती अशा विविध विषयांना स्पर्श केला गेला आहे.
निवड झालेले चित्रपट
कथात्मक लघुपट:
- एएनयू (14 मिनिटे), दिग्दर्शिक – पुलकित अरोरा (इंग्रजी/हिंदी/माओरी)
- ट्युजडे वुमन (29 मिनिटे), दिग्दर्शक इमाद शाह (इंग्रजी)
- गिध्ध (25 मिनिटे), दिग्दर्शक मनीष सैनी (हिंदी):
लघु माहितीपट:
- गोपी (14 मिनिटे), दिग्दर्शन – निशांत गुरुमूर्ती (कन्नड)
- आयर्न वुमन ऑफ मणिपूर (26 मिनिटे), दिग्दर्शन – होबन पबन कुमार (मणिपुरी/इंग्रजी) :
माहितीपट, मध्यम-लांबी:
- व्हेअर माय ग्रँडमदर लिव्हज (51 मिनिटे), दिग्दर्शन – तस्मिया आफरीन मौ (बंगाली)
- लडाख 470 (38 मिनिटे), दिग्दर्शन – शिवम सिंग राजपूत (हिंदी/इंग्रजी):
पूर्ण लांबीचा चित्रपट:
- द एक्सलेशन (भयपट) – (82 मिनिटे), दिग्दर्शक – सन्मान रॉय (बंगाली)
2.रिटर्न ऑफ द जंगल (अ ॅनिमेशन) – (105 मिनिटे), दिग्दर्शक – वैभव कुमारेश (हिंदी)
निवड झालेल्या चित्रपटांची संकल्पना आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरुन PIB च्या संकेतस्थळाला भेट द्या.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1976417
SL/KA/SL
11 Nov. 2023