बसपाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भाजप, काँग्रेस आणि देशातील आघाडीच्या राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आज बहुजन समाज पार्टीने (बसपा) १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बसपाचे राष्ट्रीय महासचिव मेवालाल गौतम यांनी ही यादी घोषित केली आहे. बसपाच्या यादीत 7 मुस्लिम तर जेडीयूच्या यादीत 6 ओबीसी, 5 अति-मागासवर्गीय, 1 महादलित, 1 मुस्लिम आणि 3 सर्वण समाजातील आहेत.
पक्षाने सहारनपूर येथून माजिद अली यांना तिकीट दिलं आहे. तर अमरोहा जागेसाठी मुजाहिद हुसैन यांना पक्षाने संधी दिली आहे.बहुजन समाज पार्टीने तब्बल सात मुस्लिम उमेदवारांना मैदानामध्ये उतरवलं आहे. या नावांमध्ये मुरादाबादहून इरफान सैफी, रामपूरहून जीशान खान, संभलहून शौलत अली, आंवला मतदालसंघातून आबिद अली, पीलीभीतच्या जागेवरुन अनील अमहद खान उर्फ फूलबाबू यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
केराना येथून श्रीपाल सिंह, मुजफ्फरनगरहून दारा सिंह प्रजापती, बिजनौर मतदारसंघातून विजेंद्र सिंह, नगीना (एससी) मतदारसंघातून सुरेंद्र पाल सिंह, मुरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद इरफान सैफी, रामपूर मतदारसंघातून जीशान खान, संभल मतदारंशातून शौलत अली.
तसेच मेरठमधून देववृत्त त्यागी, बागपत मतदारसंघातून प्रवीण बंसल, गौतमबुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोळंकी, बुलंदशहर मतदारसंघातून गिरीश चंद्र जाटव, आंवलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनिस अमहद खान, शाहजहांपूरमधून डॉ. दोदराम वर्मा यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे.
SL/ML/SL
24 March 2024