आम्ही काम केले आहे आणि काम करत राहणार
शिवसेना विभाग प्रमुख विजय दाऊ लीपारे
मुंबई, दि २६
आम्ही निवडणुकीपुरतं काम करत नसून संपूर्ण वर्षभर काम करत असतो आणि यापुढे देखील काम करत राहणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय दाऊ लिपारे यांनी भायखळा येथील घोडपदेव परिसरातील विविध कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले. ते पुढे म्हणाले काही लोकं हे निवडणुकीपुरते येत असतात आणि निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासन देतात आम्ही हे करू आम्ही ते करू अशी प्रलोभने दाखवतात. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच काम करत नाही. आमचा जनसंपर्क हा विभागातील जनतेसोबत जोडलेला असून आम्ही नेहमी जनतेमध्येच राहतो आणि जनतेची कामे करतो यापुढे देखील कामे करत राहणार असल्याची ग्वाही विजय लिपारे यांनी आपल्या भाषणातून दिली.
भायखळा विधानसभेच्या लोकांशी माझे जवळीक नाते आहे. भायखळातील नागरिकांच्या सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील आणि याआधी देखील राहिले आहे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी मला भायखळा विधानसभेच्या नागरिकांनी दिली आहे त्यांचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही. खासदार मिलिंद देवरा यांचे विशेष लक्ष हे भायखळा विधानसभेवर आहे आणि त्यांनी त्यांचे खासदार निधीतून अनेक कामे या भायखळा विभागामध्ये केली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. यापुढे देखील मी जोमाने भायखळा विधानसभेच्या लोकांसाठी काम करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी आपल्या भाषणातून या कार्यक्रमात दिली.
याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरसेविका वंदना गवळी, जगदीश नलावडे विभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS