लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात

 लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात

पुणे, दि १ : लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल. यामध्ये श्री. अनिल बांगडिया, रवि अग्रवाल, डॉ. अभिजीत सोनवणे, लायन सलीम शिकलगार, डॉ. अशोक अग्रवाल, ऋतुजा जाधव, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. रश्मी आणि डॉ. सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळविण्याचे एक माध्यमदेखील आहे. या प्रसंगी लायन रवि अग्रवाल, लायन अविनाश साकुंडे, लायन गिरीश संभ्याल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या सामाजिक सेवा
लायन्स इंटरनॅशनल गेल्या १०८ वर्षांपासून २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी ३० कोटींहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते. प्रांत 3234 D2 (पुणे, अहमदनगर, नाशिक) तर्फे डायबिटीस, कर्करोग, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत.

लवकरच धर्मपुत्र अभियान (अकेले राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार) तसेच नवा सवेरा (अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान) सुरु केले जाणार असून हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *