लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा गौरव

पुणे, दि १५: लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ D2 तर्फे आयोजित “लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळा २०२५” हा भव्य कार्यक्रम आज पुण्यातील प्रतिष्ठित हॉटेल शेराटन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० विशिष्ट व्यक्तिमत्वांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री संगीता बिजलानी होत्या. त्यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांसह पुरस्कार प्रदान केले.
विशिष्ट अतिथी म्हणून श्री फत्तेचंद रांका (अध्यक्ष – पुणे व्यापारी महासंघ), श्री कृष्णकुमार गोयल (चेअरमन – कोहिनूर ग्रुप), श्री मनीष भारद्वाज (डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय) आणि श्री विनोद वर्मा (लायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल) हे उपस्थित होते.
सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यक, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सेवा या विविध क्षेत्रांतील अग्रगण्य व्यक्तिमत्वांचा समावेश होता.
प्रमुख सन्मानितांमध्ये अनिल बांगडिया, डॉ. अभिजीत सोनवणे, लायन सलीम शिकलगर, ऋतुजा जाधव, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. रश्मी, डॉ. सिद्धार्थ टंडन, तसेच नितिन अग्रवाल, सोनू अग्रवाल, आशा ओसवाल, रवींद्र गोलार, डॉ. महेश थोरवे (MIT Group of Institutions), संजय जालान, रवी अग्रवाल, रुजुता जगताप, तनय अग्रवाल आणि ब्युटी क्वीन व मॉडेल ईशा अग्रवाल यांचा समावेश होता.
या सर्वांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरविण्यात आले.KK/ML/MS