लीलावती रुग्णालय देणार
देश सेवकांना मोफत वैद्यकीय उपचार

 लीलावती रुग्णालय देणारदेश सेवकांना मोफत वैद्यकीय उपचार

मुंबई, दि. 9
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवविले याचे संपूर्ण ऑपरेशनचे लीलावती हॉस्पिटलने कौतुक केले आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सरकारच्या शूर कामगिरीचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि यास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूर या लढ्यात जखमी झालेल्या शूर विरांना लिलावती रूग्णालयाद्वारे मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील, अशी माहिती लीलावती रूग्णालयाच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे.
लीलावती हॉस्पिटलच्या विश्वस्त मंडळाने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचे कौतुक करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेत जखमी झालेल्या सशस्त्र दलांच्या सदस्यांना तातडीच्या किंवा विशेष काळजीची आवश्यकता असलेल्यांना देश सेवकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी या सेवेसाठी सज्ज आहेत. लीलावती रुग्णालय हे केवळ आरोग्यसेवा पुरवत नसून मानवी कल्याणाकडे तितकेच लक्ष पुरवित असल्याचे यातून सिध्द होते.
KK/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *