रामलीलेप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनाही मंडपाच्या भाड्यात सवलत हवी

 रामलीलेप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनाही मंडपाच्या भाड्यात सवलत हवी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवाला आता एका महिन्यावर येऊ घातला असता. मंडप उभारणीसाठी गणेशोत्सव मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. मुंबईमध्ये मोकळ्या जागांच्या कमतरतेमुळे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालिकेच्या मैदानात मंडप उभारतात. मंडप उभारणीसाठी पालिकेकडून भाडे आकारले जाते. रामलीलासाठी पालिका प्रशासन मंडळांना ५० टक्के सवलत देते. त्याप्रमाणे पालिकेच्या मैदानात गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत द्यावी. तसेच मंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात नि:शुल्क अग्निशमन दलाची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

गणेश मंडळे ३० दिवस सजावट करण्यासाठी व ३ दिवस सजावट काढण्यासाठी अशा २ वेगवेगळ्या परवानगी कित्येक वर्ष काढत असतात. परंतु यासाठी पालिकेकडून आकरण्यात येणारी अनामत रक्कम व भाडे मंडळाकडे जमा होणाऱ्या तुटपुंज्या वर्गणी, देणगीचा विचार करता अवाजवी आहे. मुंबईत साजरा होणाऱ्या रामलीला कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या पालिकेच्या मैदानाच्या भाड्यात महाराष्ट्र शासनाच्या मुंबई उपनगर पालकमंत्री यांच्या आदेशान्वये पालिकेच्या मैदानाचा रामलीला मैदानासाठी वापर करण्यासाठी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली. यासाठी पालिकेने ६ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र निर्गमित केले होते, इतकेच नव्हे तर अग्निशमन सेवा निशुल्क वापरण्याची आदेशही देण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा मुंबईत साजरा होणारा जगप्रसिद्ध उत्सव आहे. त्यामुळे रामलीला कार्यक्रमासाठी देण्यात येणाऱ्या सवलती प्रमाणेत गणेश मंडळाकडून वापरण्यात येणाऱ्या महापालिकेच्या मैदानाच्या भाड्यात ५० टक्के सवलत मंडळांना देण्यात यावी तसेच ५०० हून अधिक भाविक जमा होणाऱ्या मंडळाच्या मंडपाशेजारी निशुल्क अग्निशामक सेवा पुरविण्यात यावी अशी मागणी मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

SL/ML/SL

29 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *