फुटबॉल सामना सुरु असताना मैदानावर कोसळली वीज
ब्राझील, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलच्या ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात घडली आहे.येथील एका फुटबॉल सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका २१ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. तर इतर ६ खेळाडूही या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. या ६ खेळाडूंवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ही घटना १० डिसेंबर रोजी घडली. जोस एल्युटेरियो दा सिल्वा स्टेडियमवर यूनिआओ जेरेन्स फुटबॉल क्लब विरुद्ध यूनिडोस फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळला जात होता.
सामन्यादरम्यान अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. यादरम्यान फुटबॉल मैदानावर मोठा आवाज झाला आणि मैदानाबाहेर पडत असलेले खेळाडू अचानक खाली कोसळले. यात ‘यूनिआओ जेरेन्स फुटबॉल क्लबचा खेळाडू कायो हेन्रिक डी लिमा गोन्काल्व्हसचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका खेळाडूची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खेळाडू शहराबाहेरील प्रादेशिक रुग्णालयात दाखल आहे. इतर ४ खेळाडू शहरातील स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. lightning-struck-the-field-during-a-football-match Brazil
SL/KA/SL
13 Dec. 2023