मुंबईत कोसळणार पावसाच्या हलक्या सरी, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. अलीकडेच काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईत पुढील ४८ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते त्यात वातावरण बदलामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.