ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. या वर्षी साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना  जाहीर करण्यात आला आहे  समाजकार्य विभागात  शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मासूमच्या सहसमन्वयक डाॅ. मनीषा गुप्ते, साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ आणि पुरस्कार निवड समितीचे मुकुंद टाकसाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर झालेले  साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर 

  • राजन गवस – कथा आणि कादंबरी वाङ्मय क्षेत्रातील कामगिरीबद्दल
  • सोनाली नवांगुळ – अनुवाद व लेखन या क्षेत्रातील कामासाठी यांना विशेष पुरस्कार
  • अनिल साबळे – ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार,
  • शरद बाविस्कर – ‘भुरा’ या आत्मकथनासाठी  अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार
  • संदेश कुलकर्णी  -‘पुनश्च हनिमून‘ नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार

समाजकार्य पुरस्कार

  • दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी औरंगाबाद येथील शांताराम पंदेरे आणि गेल्या वर्षभरात विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी करमाळा येथील प्रमोद झिंजाडे यांना सामाजिक क्षेत्रासाठीचे विशेष कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले येणार  हे दोन्ही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत.
  • गडचिरोली येथील कुमारीबाई जमकातन यांना संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव यांना प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • दिल्ली येथील ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

12 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *