अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ साठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली आपली सदाबहार आवडती जोडी ‘सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर’ बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहे. झी चित्रगौरव पुरस्कार २०२३” रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येईल.
अशोक सराफ यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी चित्रपटसृष्टील अशोक सराफ यांचे आभाळाप्रमाणे आहे. नायकापासून खलनायक ते विनोदी अभिनेता असा यशस्वी प्रवास करणारे अशोक सराफ यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. सन 1969 ते आजपर्यंत ते मराठी चित्रपटसृष्टीचा हिस्सा आहेत आणि वयाच्या 70व्या वर्षीही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
SL/KA/SL
20 March 2023