दुहेरी हत्याकांडात तिघांना जन्मठेप….

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावली आहे .या आरोपी मध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे.
नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झाला.. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे 10 एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकार आणि आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद झाला. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची 17 फरवरी 2018 रोजी निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती.
तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न करून एसीपी बनसोड कोतवाली यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते .युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी असे सांगितले की आरोपी विरुद्ध सरकार पक्षाने पुरावा कायद्याचे अनुषंगाने सबळ पुरावे कोर्टा समोर सिद्ध केले आहे . या प्रकरणात सरकारतर्फे एकूण 35 साक्षीदार पडताळण्यात आले आहे.Life imprisonment for three people in double murder.
ML/KA/PGB
14 July 2023