RBI कडून या बँकेचा परवाना रद्द
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मुंबईतील द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार असून बँकेचे सर्व व्यवहार १९ जूनपासून गोठविण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला असला तरी प्रत्येक खातेदाराला त्याची ५ लाखांपर्यंतची विमा संरक्षण रक्कम मिळविता येणार आहे.रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि खातेदार वाढविण्याची क्षमता नसल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुरेशा भांडवलाची कमतरता आणि कमाईच्या संधी नसल्यामुळे महाराष्ट्रातील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्यासाठी आणि लिक्विडेटर नियुक्त करण्यासाठी आदेश जारी करण्यास सांगितले आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.
SL/ML/ML
20 June 2024