LIC करणार आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवन विमा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी आता आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.LIC कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते. या दिशेने काम वेगाने सुरू आहे आणि नियामक मान्यता मिळाल्यानंतर, कंपनीचा स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमध्ये हिस्सा असेल. मात्र, एलआयसी ज्या कंपनीत गुंतवणूक करणार आहे, त्या कंपनीचे नाव त्यांनी अद्याप उघड केलेले नाही.
यापूर्वी, जून तिमाहीचे निकाल जाहीर करताना, मोहंती यांनी असेही सूचित केले होते की, ही सरकारी मालकीची कंपनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये आरोग्य विमा क्षेत्रात अधिग्रहण करू शकते. यासह, 1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या सरेंडर व्हॅल्यूच्या नवीन नियमांवर भाष्य करताना ते म्हणाले की एलआयसीने नवीन नियमांनुसार आपल्या विमा उत्पादनांची पुनर्रचना केली आहे आणि ती नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे.
गेल्या एका वर्षात LIC चे शेअर्स 48 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 2024 मध्ये हा विमा शेअर 6 टक्क्यांनी वाढला आहे.
SL/ ML/ SL
9 Nov.2024