LIC कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी

 LIC कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी

मुंबई, दि. ५ : नव्या वर्षाच्या निमित्ताने LIC ने पॉलिसीधारकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने 2 महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे. एलआयसीचे हे विशेष अभियान 1 जानेवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत चालवले जाईल. या मोहिमेत सर्व ‘नॉन-लिंक्ड’ पॉलिसींचा समावेश करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत, पुन्हा सुरू करण्यायोग्य सर्व ‘नॉन-लिंक्ड’ योजनांच्या विलंब शुल्कात (Late Fee) 30% पर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सूट जास्तीत जास्त 5,000 रुपये पर्यंत मर्यादित असेल. विशेष म्हणजे, मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीधारकांना विलंब शुल्कात 100% सूट देऊन त्यांना पूर्ण दिलासा देण्यात आला आहे.

ज्या पॉलिसींचा प्रीमियम भरण्याचा कालावधी संपलेला नाही आणि ज्या पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी बंद झाल्या आहेत, त्या या मोहिमेअंतर्गत पुन्हा सुरू करता येतील. मात्र, वैद्यकीय किंवा आरोग्याशी संबंधित चाचण्यांच्या नियमांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *