LIC ने टाटा ग्रुपमध्ये केली 88,404 कोटींची गुंतवणूक
मुंबई, दि. १७ : नवी दिल्ली, दि. १७ :LIC ने टाटा ग्रुपमध्ये तब्बल ₹88,404 कोटींची गुंतवणूक केली असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, LIC ने देशातील प्रमुख उद्योगगटांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, ज्यात टाटा ग्रुप सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने टाटा ग्रुपमध्ये तब्बल ₹88,404 कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक LIC च्या देशातील प्रमुख उद्योगगटांवरील विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. संसदेत राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली.
टाटा ग्रुपनंतर LIC ने HDFC बँकेत ₹80,843 कोटी, रिलायन्स ग्रुपमध्ये ₹60,065 कोटी, अदानी ग्रुपमध्ये ₹47,633 कोटी, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ₹46,621 कोटी इतकी गुंतवणूक केली आहे. या पाच प्रमुख गटांमध्ये LIC चे एकूण ₹3.23 लाख कोटी इतके भांडवल गुंतलेले आहे.
मंत्री चौधरी यांनी सांगितले की, LIC ने एकूण 35 देशांतर्गत कंपन्या किंवा गटांमध्ये ₹5,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या सर्व गुंतवणुकींची एकत्रित रक्कम तब्बल ₹7.87 लाख कोटी इतकी आहे. या यादीत L&T, युनिलिव्हर, IDBI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप यांचा समावेश आहे.
LIC ची गुंतवणूक धोरण ही मंडळाच्या मान्यतेने ठरवली जाते आणि त्यानुसारच विविध उद्योगगटांमध्ये गुंतवणूक केली जाते. या धोरणामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते तसेच दीर्घकालीन परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
या मोठ्या गुंतवणुकीमुळे टाटा ग्रुपच्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पांना चालना मिळणार असून, LIC च्या गुंतवणुकीमुळे देशातील औद्योगिक विकासाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.