ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला मिळाला राज्य शासनाचा सर्वाेत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.
यवतमाळ दि. १–
आज दूरचित्रवाणी आणि मोबाईलच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.परंतु याही परिस्थितीत काही संस्था, वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. या वाचनालयाला राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट वाचनालयाचा पुरस्कार मिळाला आहे.
यवतमाळ येथील ज्ञानदीप वाचनालयाचा उल्लेख करावा लागेल. वाचाल तर वाचाल या म्हणी प्रमाणे वाचनाचे महत्व ओळखुन संस्थेचे अध्यक्ष संजय कोल्हे यांनी 1990 साली वाघापुर परिसरात ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सुरु केले. संजय कोल्हे वाचनालय सुरु करुन थांबले असही नाही, तर त्यांनी वाचन संस्कृती वाढली पाहीजे यासाठी नवनवे उपक्रम राबवले. यामध्ये प्रभावी ठरलं ते फिरते वाचनालय .काही जष्ठ नागरीकांना वाचनालयात जाणे शक्य होत नाही अशा नागरींकासाठी फिरते वाचनालय सुरु केले.यामध्ये संस्थेची एक व्हॅन शहरात घरोघरी जाऊन पुस्तके वाटण्याच आणि वाचून झालेली पुस्तके जमा करण्याचं काम करीत आहे.परिणामी वाचक प्रेमी नागरीकांना घरीच पुस्तके मिळू लागली आहेत.
तसेच वाचनालयामध्ये विविध वृत्तपत्र, मासिके, साप्ताहिके,
नोकरी संदर्भातील मासिके, वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत.
याशिवाय विविध विषयातील 10 हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे येथील संपुर्ण कामकाज संगणकयुक्त असून कोणतेही पुस्तक वाचकाला तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येते. इमारतीमध्ये सर्वत्र स्वच्छता तथा शांतता राखण्यात येते.या शिवाय आजच स्पर्धेच युग आहे, सर्वसामान्य मुलांना मोठा अधिकारी होता आलं पाहिजे हे ओळखून संजय कोल्हे यांनी संस्थेच्या इमारतीमध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षेची असंख्य पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. याचसोबत इमारतीमध्येच नाममात्र शुल्कावर वाचनकक्ष उभारण्यात आला आहे. येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी नियमीत अभ्यास करायला येत असतात. तसेच या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्यवस्थीत झाला की नाही ते पाहण्यासाठी वेळोवेळी त्यांची टेस्ट घेऊन त्यांची उजळणी केली जाते.
गेल्या अनेक वर्ष हे काम सातत्याने टिकून आहे .एकूणच संस्थेचे पुस्तकांविषयी वाचन संस्कृती वाढण्यासाठी केलेले कार्य पाहता महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वाेत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाने वाचन संस्कृती वाढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला भरभरुन शभेच्छा !ML/ML/MS