कोकण रल्वेवरील एक्सप्रेसना जोडले जाणार एलएचबी डबे
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ३२ वर्षांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रेल्वे मार्गावरून गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास होत आहे. गांधीधाम-नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस ही दक्षिण रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक्सप्रेस आहे. या राज्यातील ५५ स्थानकांवर ही एक्स्प्रेस थांबा घेते. महाराष्ट्रात बोईसर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड या स्थानकात थांबते.
पश्चिम, मध्य, कोकण आणि दक्षिण भारतातील रेल्वे मार्गावरून धावणारी गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसला नव्या धाटणीचे लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे डब्यांची वाढविण्यात आलेली लांबी आणि रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातील गाड्या आणि त्यातही वाढलेला वेग यामुळे गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
कोकणातील रेल्वे स्थानकात थांबत असल्याने, कोकणवासियांसाठी ही एक महत्त्वाची रेल्वेगाडी आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे निळ्या रंगातील डब्या ऐवजी लाल-करडा अशा रंगात एक्स्प्रेस असेल. कोकणवासियांना नव्या स्वरूपातील एक्स्प्रेसचा अनुभव घेता येणार आहे.
SL/ML/SL
10 Nov. 2024