मोबाईल सोडा पुस्तक जोडा अभियानाची जल्लोषात सुरुवात

मुंबई, दि 1
सध्याच्या तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. या अतिरेकी व्यसनातून सोडविण्यासाठी मोबाईल छोडो, पुस्तक जोडो’ अभियान सुरु करत आहोत, मुंबईकरांनी या महाअभियानात मोठया संख्यने सहभाग घ्यावा, असे आवाहन शांतीदूत सेवा संस्थे’चे अध्यक्ष व भायखळ्यातील सामाजिक कार्यकर्ते बुवा कुलकर्णी यांनी केले आहे.
‘सबुरी बस्ती स्तर संघ’ आणि ‘शांतीदूत सेवा संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील राणीबाग जवळील लुनावा भवन सभागृहात वहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, यावेळी शिक्षण तज्ज्ञ व बिझनेस कोच सुशील भालचंद्र मुणगेकर, लेखक व चित्रपट निर्मति ज्ञानेश्वर विश्वनाथ मर्गज यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
‘मोबाईल छोडो, पुस्तक जोडो अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर, महापुरुषांची
चरित्रे, स्पर्धा परीक्षा यांसारखी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, यासाठी ग्रंथालये उभारण्याचा मानसही कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.
कणखर मन व दणकट शरीर हे केवळ मैदानावर खेळ खेळल्यानेच तयार होवू शकते, मात्र सध्या मोबाईलच्या अतिरेकामुळे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे मैदानांवरील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सबुरी बस्ती स्तर संधा’च्या अध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी यांनी दिली, कुलकर्णी यांच्या या मुद्याचा धागा पकडून चित्रपट निर्मात ज्ञानेश्वर मर्गज यांनी सांगितले की, मुलांबरोबर मुलींनीही मैदानी खेळ
खेळण्यावर भर दिला पाहिजे, यावेळी सुशील भालचंद्र मुणगेकर यांनीही पालक व विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक व प्रशिक्षक सुगत प्रिय शिंदे, पत्रकार महेंद्र गावडे, सतीश खांडगे, गणेश धायगावे, दर्शन सावंत यांनी विशेष मेहनत घेतली