शिवसन्मानासाठी आता चलो आझाद मैदान
महाड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांबाबत लवकर कारवाई करा,आपण गप्प बसणार नाही असे सांगत उदयनराजे यांनी चलो आझाद मैदान अशी घोषणा केली आहे. Let’s go to Azad Maidan
निर्धार शिवसन्मानाचा अशी मोहीम राबवून छत्रपती उदयनराजे यांनी आज किल्ले रायगडावर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल हे पद आदराचे आहे मात्र त्यावरील व्यक्तीने आदर रहावा असेच बोलले पाहिजे असे ते म्हणाले.
राज्यपाल जे बोलले त्यावर प्रतिक्रिया न देणारेही तितकेच दोषी आहेत, छत्रपतींचा अवमान सहन होऊ शकत नाही, जाती पातीच्या राजकारणात देशाचे तीस तुकडे ही होऊ शकतात असे ते म्हणाले.
आता स्वराज्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे, राज्यपालांवर कारवाई व्हायला हवी अन्यथा आपण स्वस्थ बसणार नाही, यापुढे आपण मुंबईतील आझाद मैदानात याबाबत लढा देऊ असे उदयन राजे यांनी घोषित केले.
ML/KA/PGB
3 Dec .2022