पर्यावरण पूरक होळी साजरी करूयात!

 पर्यावरण पूरक होळी साजरी करूयात!

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरण पूरक होळी साजरी करूयात! ‘‘होळी करा लहान.. पोळी करा दान!’’ या उपक्रमातून महाअंनिस पिंपरी-चिंचवड शाखा गेली अनेक वर्ष पर्यावरण पूरक होळीविषयी प्रबोधन करत आहे. नागरिकांनी साधेपणे घरगुती पर्यावरण पूरक होळी साजरी करावी व पोळीचे वाटप गरजूमध्ये करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेने केले आहे.

अपशब्दांचे दहन करून चांगल्या गोष्टी, विचारांचे आचरण, पाण्याचा अपव्यय टाळणे व पर्यावरणाचा समतोल साधने हा संदेश घेऊन पोळी संकलनाचे काम गेली पंचवीस वर्षांपासून केले जाते. देहूरोड भागातील चिंचोली, झेंडे मळा व बिजलीनगर, चिंचवड भागातील होळीमध्ये नैवेद्य म्हणून वाहण्यात येणारे अन्न, पोळी, नारळ इत्यादीचे संकलन करून देहूरोड मधील गरीबवस्ती मध्ये वाटपाचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येते.

Let’s celebrate environment friendly Holi!

PGB/ML/PGB
20 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *