”गोष्टी पाण्याच्या” मधून जलव्यवस्थापनाचे धडे
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी एप्रिल-मेमध्ये साऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या अपुऱ्या ठरताना दिसत आहेत. त्यामुळे सुयोग्य पद्धतीने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज झाली आहे.
गावोगावच्या वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थांची सविस्तर माहिती देत सफर घडवणारा आणि ‘पाणी’ या विषयावर अनेक वैविध्यपूर्ण अन् अभ्यासपूर्ण माहिती लेख असलेला ‘गोष्टी पाण्याच्या’ हा दिवाळी विशेषांक पर्यावरण अभ्यासक हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांनी तयार केला आहे.
या अंकाचे रविवारी (ता. २९) प्रकाशन सायंकाळी ५ ते ८ वाजता या वेळेत रत्नागिरीतील ल. वि. केळकर सभागृहात जयश्री इलेक्ट्रॉनचे धनंजय दाबके यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्या निमित्ताने पाणी या विषयावर तज्ञ अभ्यासकांची व्याख्याने असलेला ‘जलसंवाद’ हा कार्यक्रम आणि प्राजक्ता काकतकर यांच्या शास्त्रीय, नाट्यगीत व अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे. Lessons in water management from ‘things water’
पाणी ही माणसाची मुलभूत गरज.
आज वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण यांचा जलस्रोतांवर मोठा ताण पडत आहे. कोकणासारख्या पाणीबहुल प्रदेशातही उन्हाळ्यात विहिरी आटण्याचे प्रकार होत आहेत. यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विचारांना चालना मिळावी या दृष्टिकोनातून दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून ‘पाणी’ या विषयावर तज्ञ अभ्यासकांची व्याख्याने असलेला ‘जलसंवाद’ कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये ‘दक्षिण कोकणातील भूजल’ या विषयावर डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ‘नद्यांमधील गाळ ः समस्या आणि उपाय’ या विषयावर अविनाश निवाते आणि ‘स्थलानुरूप जलसंधारण’ या विषायावर डॉ. उमेश मुंडले यांचे व्याख्यान होणार आहे.
ML/KA/PGB
23 Oct 2023