पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्या फरार

 पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्या फरार

पुणे,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून एक बिबट्या अचानक गायब झाला आहे. या बिबट्याचा गेल्या ३६ तासांपासून शोध सुरू असून अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्याचे लोखंडी गड वाकवून या बिबट्याने धूम ठोकली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचा अंदाज असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

पहाटे ४:५३ च्या सुमारास बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. अग्निशामक दलासह पुणे, नाशिकची रेस्क्यू टीम,५० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून बिबट्या अचानक गायब झाला आहे. या बिबट्याचा गेल्या ३६ तासांपासून शोध सुरू असून अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही.हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत.

पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून बिबट्या पळाला असल्याचे प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडालीय. दरम्यान, मजबूत पिंजऱ्यातून बिबट्यानं धूम ठोकल्यानंतर आता हा बिबट्या सापडेपर्यंत प्राणी संग्रहालय बंद राहणार आहे. बिबटया पळाल्याचे लक्षात येताच १३० एकर परिसरात, घनदाट जंगलात या बिबट्याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीच्या बिबट्याने पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून धूम ठोकली आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. दरम्यान आजूबाजूच्या सोसायट्यातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

SL/KA/SL
5 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *