लिंबाच्या भावात तेजी, मिळतोय दोनशे रुपये किलो पर्यंतचा भाव…

जालना दि २४:– जालना जिल्ह्यात लिंबाच्या दरात तेजी पाहायला मिळत असून सध्या बाजारात दोनशे रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होत आहे. उन्हाळा वाढू लागल्याने लिंबाला मागणी वाढत आहे. मात्र, आवक कमी असल्याने लिंबाचे भाव वाढल्याचे चित्र जालना बाजारात पाहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील राजूर, टेंभुर्णी आणि जालना शहरांतील भाजी मार्केटमध्ये लिंबांची 150 ते 200 रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, एक लिंबू 5 ते 10 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सध्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेत. जालना जिल्ह्यात लिंबाची पाहिजे त्या प्रमाणात लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे, जालन्यात परजिल्ह्यांतून लिंबांची आवक होत आहे.