हॉटेल सारखे चिकन फ्राय
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला चिकन खावेसे वाटत असेल तर ग्रेव्ही चिकन बनवण्यात वेळ वाया घालवू नका, फक्त 20 मिनिटांत लेमन चिकन फ्राय बनवा.
लागणारे जिन्नस:
१.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)
२.दही- 1 मोठा चमचा
३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा
४.लाल मिरची पावडर
५.हळद
६.तेल
7.मीठ
८.लिंबू-1
९.सजावटीसाठी कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
1.चिकन स्वच्छ धुवून घ्या
2.एका भांड्यात चिकन,दही, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, जराशी हळद,थोडं मीठ लावून दोन तास मॅरीनेट करून घ्या.
3.दोन तासानंतर,गॅस स्टोव्ह चालू करा.
4.त्यावर फ्राईंग पॅन ठेवा, पॅनमधे एक चमचा तेल टाका
5.तेल गरम झाले की एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका.
6.आले-लसूण पेस्ट छान परतून घ्या.
7.आता मॅरीनेट केलेले चिकन पॅनमधे टाका, फूल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमधेच लॉक होतात.
8.दोन मिनटानंतर गॅस सिम करा, आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
9.मधे मधे बघा पाणी आटले का ते.
10.चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
11.गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका.कोथिंबीर टाकून सजवा.
लेमन चिकन फ्राय तयार.
लिंबू चिकन फ्राय रेसिपी
PGB/ML/PGB
21 Oct 2024