ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन
ब्राझील, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे संपूर्ण नाव एड्सन आरेंटीस डू नाशसिमेंटू असे होते. त्यांचा जन्म ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात झाला, लहानपणापासून त्यांना फुटबॉलची आवड होती. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. जगभरचे चहाते त्यांना‘किंग’ पेले किंवा ‘ब्लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले.
पेले यांची एकूण गोलसंख्या १,३६३ सामान्यांत १,२८१ एवढी होती. १ ऑक्टोबर १९७७ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी पेले फुटबॉल खेळातून निवृत्त झाले.
SL/KA/SL
30 Dec. 2022