लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळती, सुरक्षा यंत्रणा सतर्क

 लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळती, सुरक्षा यंत्रणा सतर्क

लखनौ, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या विमानतळावर आज एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. येथील कार्गो टर्मिनलवर कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारा एक किरणोत्सर्गी पदार्थ सापडला असून त्यातून किरणोत्सर्ग झाल्याने विमानतळावरील दोन कर्मचारी बेशुद्ध झाले. किरणोत्सर्ग होताच सुरक्षा उपकरणांचा अलार्म वाजला. यामुळे घबराट उडाली. या घटनेची माहिती तातडीने NDRF, SDRF व इतर सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर तब्बल १.५ किमी परिसर हा रिकामा करण्यात आला आहे. बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. ज्यांना ज्यांना किरणोत्सर्ग झालं आहे त्यांना थांबवून घेण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आज एक विमान लखनौहून गुवाहाटीला जात होते. लखनौ विमानतळाच्या टर्मिनल ३ वर स्कॅनिंग दरम्यान मशीनचा बीप वाजला. कर्करोगविरोधी औषधे लाकडी पेट्यांमध्ये पॅक करण्यात आले होते. ज्यामध्ये किरणोत्सर्गी घटक वापरले जातात. ही किरणोत्सर्गी सामग्री लीक झाली. यामुळे अलार्म वाजताच सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. यासोबतच NDRF आणि SDRFपाचारण करण्यात आले होते. यादरम्यान एकच गोंधळ उडाला. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रवाशांना हटवून जागा मोकळी करण्यात आली आहे.

दरम्यान, गळती झालेला पदार्थ हा फ्लोरीन असल्याची माहिती समोर येत आहे. याचा पदार्थ मानवी शरीरावर जीवघेणा परिणाम होते. फ्लोरीनमुळे आग लागू शकते किंवा ती भडकू शकते. फ्लोरीन ऑक्सिडायझर म्हणून कार्य करते. फ्लोरीन गॅस असून तो गरम झाल्यास मोठा स्फोट होऊ शकतो. तसेच हा गॅस श्वासामार्फत पोटात गेल्यास मृत्यू देखील ओढवू शकतो. फ्लोरीनमुळे जळजळ आणि डोळ्यांना मोठा त्रास होऊ शकतो. विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे आज झालेल्या घटनेत कोणातीही जीवित हानी झालेली नाही.

SL/ML/SL

17 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *