मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त लातूर जिल्हा दौऱ्यावर

लातूर दि २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने अतिवृष्टीग्रस्त लातूर जिल्ह्यातील औसा येथे दाखल झाले असून ते औसा तालुक्यातील उजनी गावाकडे रवाना झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे उजनीत झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, आ. अभिमन्यू पवार याची उपस्थिती आहे. औसा येथून दुपारनंतर वाजता हेलिकॉप्टरने निलंगा तालुक्यातील नणंद येथे त्यांचा पाहणी दौरा झाला, त्यानंतर त्यांनी औराद शहाजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.ML/ML/MS