मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,पोलीसही जखमी

 मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,पोलीसही जखमी

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार दिवसापासून शांततेत असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले.
महामार्गावर बसेस जाळण्यात येऊन आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरुवात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत

आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मोठा फौज फाटा बोलवण्यात आला होता. जालन्यातील शहागड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं.आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अलटीमेटम दिला होता.पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केलं होते. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता.

आज या ठिकाणी काही समाज कंटकांनी दगड फेक केली त्यात काही पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाल्या आहेत, काही गावकरी देखील जखमी झाले आहेत.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने महिला आंदोलक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तर आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आले असून दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे तसेच एक ट्रक सुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबाद सोलापूर महामार्गावर तीन ते चार बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे , याच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे.

ML/KA/SL

1 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *