दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार

 दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार

लातूर दि १३ : जिल्ह्राचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शिवराज पाटील चाकुरकर यांच्यावरती आज लातूर येथील वरवंटी शिवारात असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ , राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे , खा.अशोक चव्हाण,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे, माजी खा. चंद्रकांत खैरे,माजी मंत्री संजय बनसोडे,
माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, यांच्यासह देशभरातून अनेक मान्यवर, नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या वतीने हा अंत्यविधी शासकीय इतमामात असल्यामुळे पोलिस विभागाच्या वतीने हवेत गोळ्या झाडून गार्डऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर त्याचे सुपुत्र शैलेश पाटील चाकूरकर यांनी आपल्या पित्याला मंत्र उच्चारात अंतिम निरोप दिला .
अंत्यविधी पूर्वी त्यांची लातूर शहरातील घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली. ही राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पीव्हीआर चौक,व पीव्हीआर चौक येथून वरवंटी शिवार इथपर्यंत आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *