HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी उद्या शेवटचा दिवस
मुंबई, दि. २९ : वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) बसवण्यासाठी उद्या अखेरची मुदत आहे. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटबसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मार्च २०२५ही मुदत दिली होती. मात्र, त्याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद असल्याने ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतरही नंबर प्लेट बदलणे बाकी असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. या सर्व वाहनांवर कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नव्या नंबर प्लेट लावण्यासाठी सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देऊ शकते. सध्या यासंदर्भात सरकारकडून काही स्पष्ट केलेले नसले, तरी लवकरच प्रशासनाकडून दिशानिर्देश जारीकेले जातील, असे मानले जाते.
देशभरात वाहनांना एकाच स्वरूपाच्या नंबर प्लेट असाव्यात, यासाठी HSRP अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वप्रकारच्या वाहनांना नवीन सुधारित, अद्ययावत नेमप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने एजन्सी नेमली आहे.
HSRP म्हणजे “High Security Registration Plate” (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट) जी भारतातील सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. ही विशेष नंबर प्लेट वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि छेडछाड रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे
SL/ML/SL