अकरावीच्या प्रवेशाच्या अंतिम फेरीस मुदतवाढ
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी सध्या सुरू आहे. या फेरीत प्रवेश घेऊ न शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने मंगळवारपर्यंत (दि. २ सप्टेंबर) मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे अजूनही प्रवेश बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी मिळणार आहे.
या वर्षी अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेतून होत आहेत. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ‘एटीकेटी’ सूत्रास पात्र विद्यार्थी, तसेच इतर विद्यार्थ्यांनाही या फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या संधींचे प्रमाण वाढले असून, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे. अंतिम फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी मंगळवार (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या वेळेनंतर कोणतीही संधी दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
SL/ML/SL