लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 400 ते 450 पर्यंत कोसळले

 लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 400 ते 450 पर्यंत कोसळले

नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्याचं खुद्द केंद्रीय सचिवांनीच स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात १९ फेब्रुवारी रोजी कांद्याचे बाजारभाव सरासरी ६०० रुपयांनी वाढले होते ते आज ४००, ४५० पर्यंत खाली कोसळले.

त्यामुळे आनंदी झालेले शेतकरी दुपारी हे भाव पुन्हा पूर्वपदावर म्हणजेच कमी झाल्याने नाराज झाल्याचं दिसून आलं. याचे कारण म्हणजे दुपारी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार यांनी निर्यात बंदी खुली झाली नसून डिसेंबर ०८ ला लागू झाल्यानंतर ती ३१ मार्चपर्यंत कंटिन्यू लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी निर्यात खुली झाल्याची चर्चा केवळ अफवाच ठरली असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले सचिव

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहील, कारण सरकार कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यास आणि देशांतर्गत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याने निर्यात बंदी कायम आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे आणि त्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच ग्राहकांना वाजवी दरात कांद्याची पुरेशी घरगुती उपलब्धता सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे देखील सिंग यांनी स्पष्ट केले. यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले.

ML/KA/PGB 21 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *