पुण्यात लेझर शो वर बंदी

पुणे, दि. ११ : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लेझर शोवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश मोडणा-यांवर पुणे पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा निर्णय विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला आहे, कारण या प्रकाशांमुळे विमानांच्या पायलटला धोका निर्माण होऊ शकतो. लोहगाव विमानतळाच्या 15 किलोमीटर परिसरात ही बंदी लागू करण्यात आली आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा अशारा सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.