नेपाळ मधील समाजमाध्यमांवरील बंदी 20 बळी घेतल्यानंतर मागे

 नेपाळ मधील समाजमाध्यमांवरील बंदी 20 बळी घेतल्यानंतर मागे

काठमांडू, दि. ८ : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या तरुणांच्या आंदोलनाने देशभरात मोठा भडका घेतला आहे. यात २० तरुणांचा बळी गेल्यानंतर नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी मागे घेतली आहे. ‘Gen Z’ म्हणजेच नव्या पिढीच्या हजारो तरुणांनी आज रोजी काठमांडू, पोखरा, बुटवल, चितवन, नेपाळगंज आणि बिराटनगरसारख्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. १२ हजारांहून अधिक निदर्शक संसद भवनाच्या आवारात घुसले, त्यानंतर लष्कराने अनेक राउंड गोळीबार केला.
संसद भवन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान निवासस्थानाजवळील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तोडफोड करणाऱ्यांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश काठमांडू प्रशासनाने दिले आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

आंदोलनाचे कारण:
नेपाळ सरकारने ४ सप्टेंबरपासून नोंदणी न केलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी लागू केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, रेडिट आणि लिंक्डइन यांसारख्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली असून, सरकारचा दावा आहे की बनावट आयडीद्वारे द्वेषपूर्ण भाषणे, अफवा आणि सायबर गुन्हे वाढत होते

या आंदोलनामुळे नेपाळ सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरील बंदी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अनेक देश आणि मानवाधिकार संघटना चिंता व्यक्त करत आहेत.

हे आंदोलन केवळ सोशल मीडिया बंदीविरोधात नाही, तर भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि तरुणांच्या आवाजाला दडपण्याच्या विरोधातही आहे. नेपाळमधील ही परिस्थिती पुढील काही दिवसांत अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत चौकशी आणि शांततामय संवादाची मागणी आता जोर धरत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *